Sign In With   

Datun Kanth Yeto

Datun Kanth Yeto

Singers

 Vasant Deshpande

Composers

 Anil Arun

Lyricist

 Shanta Shekle

No of plays

 1605

Song Duration

 05:49

Ratings

 
Lyrics of Datun Kanth Yeto by Atul ChitalePosted:2011-09-20 22:12:31
दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे

जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखानेहातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा

रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा

वळवून अक्षरांना केले तुला शहाणे

जातो सुखावुनि मी, या गोड आठवानेबोलात बोबडीच्या संगीत जागविले

लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले

एकेक सूर यावा, न्हाऊन अमृताने

अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणेघेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे

हा देह दूर जाता, मन राहणार मागे

धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे

परक्या परी आता मी, येथे फिरुनी येणेसंकलन - अतुल चितळे

Lyrics of Datun Kanth Yeto by Atul ChitalePosted:2011-09-20 22:12:31